इमेज

Niagara Falls

Niagara Falls

परमेश्वराच्या कृपेने आजपर्यंत जगातील अनेक सुंदर गोष्टी अनुभवल्या आणि बघितल्या. अगदी परवा परवा बघितलेला नायगारा त्याला अपवाद कसा असेल?
नायगारा सारखा निसर्गाचा अद्भुत चमत्कार बघताना डोळे पाणावले नाहीत तर नवलंच! वर निळेशार आभाळ आणि खाली पडणारे हिमासारखे शुभ्र पाणी. नजरेत पुन्हा पुन्हा भरून घेऊन उतू जावे असे त्याचे सौंदर्य! हे सर्व निर्माण करणाऱ्या आणि सांभाळणाऱ्या त्या किमयागाराला माझा मनापासून नमस्कार आणि त्याचे असंख्य आभार.
नायगारा बघताना जवळच्या अनेक माणसांची कमी आम्हाला दोघांनाही जाणवली. हा फोटो त्या सर्वांसाठी 🙂